थेरपीमध्ये नक्की काय होतं?
थेरपीमध्ये नेमकं काय घडतं? प्रश्नोत्तरं? सल्ले? ऐकणं-बोलणं? थेरपीबद्दल उत्सुकता असेल, थेरपीबद्दल जाणून घ्यायचं असेल, तर हा लेख नक्की वाचा.
THERAPYMENTAL HEALTH & HEALINGMENTAL HEALTH & SOCIETY
Munnsense Counselling
9/6/20261 मिनिटे वाचा
Therapy बद्दल confusion आहे? Therapy म्हणजे नक्की काय ते समजून घेऊया.
प्रत्येक गणितासाठी एक ठराविक formula असतो.
पण जेव्हा प्रश्न एखाद्या व्यक्तीच्या मनसिक problemsचा असतो तेव्हा तिथे सरसकट एकच formula लावता येत नाही.
Therapy प्रत्येकासाठी वेगळी असते.
थेरपी प्रत्येकासाठी वेगळी का असते, याचं थोडक्यात उत्तर म्हणजे “व्यक्ती तितक्या प्रक्रुती आणि प्रक्रुती तसा मार्ग”.
पण आपण मुद्दा जरा सविस्तर समजून घेऊया.
दोन व्यक्तींना एकच problem असू शकतो. पण तरीही दोघांसाठी एकच solution काम करेल असं नाही.
कारण problem same असला, तरी तो अनुभवणारी माणसं वेगळी असतात.
आपली परिस्थिती वर-वर दुसऱ्यासारखी दिसू शकते. पण closely बघितलं तर त्यामागची कारणं, अनुभव, भीती, आठवणी, गरजा वेगळ्या आहेत असं दिसतं.
म्हणून therapy मध्ये फक्त “problem काय आहे?” हे पाहिलं जात नाही.
तर “ह्या problemचा तुमच्या मनावर काय प्रभाव होतोय?” हे समजून घेण्याचा प्रयत्न केला जातो.
Therapy मध्ये नक्की काय होतं?
आपण अनेकदा स्वतःला सांगत राहतो, "असं feel करायचं नाही,” “तसं react करायचं नाही,”
आणि सतत स्वतःच्या मूळ भावना बदलण्याचा किंवा लपवून ठेवण्याचा प्रयत्न करताना हळूहळू आपण स्वतःलाच हरवून बसतो.
अशा वेळी स्वतःला समजून घेण्याची, स्वत:च्या आंतरिक विश्वाशी ख-या अर्थाने जोडलं जाण्याची संधी आपल्याला थेरपी उपलब्ध करून देते.
आपण असं का वागतोय, नेमकं कशामुळे trigger होतोय, या सगळ्याचा आपल्या मनावर काय परिणाम होतोय, हे नव्याने समजून घेता येतं. Therapy आपल्याला आपल्याशीच नव्याने ओळख करून देते. फक्त यावेळी, it happens with softness and compassion.
Therapy sessions मध्ये नेमकं काय घडतं?
Therapy दर वेळी same दिसत नाही.
काही sessions मध्ये अश्रू असतात तर काहींमध्ये खळखळून हसू.
काही sessions मध्ये शब्दांना वाट मिळते, तर काहींमध्ये रंग आणि art ला.
काही sessions मध्ये लिहिणं, बोलणं आणि गाणं असतं, तर काहींमध्ये breathing आणि physical movement.
गरज पडेल तेव्हा therapy तुम्हाला समजावते, पण सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे therapy तुम्हाला समजून घेते.
आणि हे समजून घेताना, तुमच्यासाठी काय work करतं, त्याप्रमाणे therapyचा मार्ग ठरतो.
Therapy म्हणजे फक्त मन मोकळं करण्याची जागा आहे का?
कोणीतरी judge न करता आपलं संपूर्ण म्हणणं ऐकून घेतंय, हीच खरंतर अतिशय दिलासादायी गोष्ट वाटते.
पण therapy त्यापुरती मर्यादित नाही.
स्वतःच्या भावनांना नाव देणं असो, त्या भावनांचं मूळ समजून घेणं असो किंवा स्वतःशी थोडं प्रेमाने वागायला शिकणं असो, therapy या आणि तत्सम प्रत्येक टप्प्यावर तुम्हाला साथ देते, तुम्हाला समजून घेते, आवश्यकतेनुसार गोष्टी शिकवते.
प्रत्येक व्यक्तीच्या मनात कुठलं ना कुठलं ओझं असतं. त्या ओझ्याच्या स्वरूपानुसार therapyचा मार्ग ठरतो.
म्हणूनच therapy ही one-size-fits-all गोष्ट नाही. ती व्यक्तीनुसार बदलते.
तुमचा स्वभाव, तुमचे अनुभव, तुमच्या भावना, तुमची परिस्थिति, तुम्हाला काय comfortable वाटतं, या सगळ्या गोष्टी लक्षात घेऊन therapy चा प्रवास होतो.
थोडक्यात काय, तर प्रत्येक problemला एकच formula लागत नाही.
त्यामुळे प्रत्येकाची healing journey, प्रत्येकाची therapy journey वेगळी दिसते.
तुम्हाला पण तुमची healing journey सुरू करायची असेल, स्वतःला थोडं अधिक समजून घ्यायचं असेल, आणि मनातला गोंधळ थोडा clear करायचा असेल, तर Munnsense Counselling तुमच्या या प्रवासात तुमची साथ द्यायला तयार आहे.
सुरुवात करण्यासाठी Munnsense Counselling ला WhatsApp वर मेसेज करा किंवा हा Contact Form भरा.
This article was written by Sharvari Bendre and edited by Kashmira Sawant.


