नमस्कार! मी कश्मिरा सावंत.
मनसेन्स काउन्सिलिंग हा ऑनलाइन थेरपी आणि मानसिक आरोग्या संदर्भात समुपदेशन सेवा देण्याचा माझा एक छोटासा प्रयत्न आहे. ७+ वर्ष मानसशास्त्राचा अभ्यास करून, त्यात एक बीए डिग्री, एक एमए डिग्री, आणि पुराव्यावर आधारित मानसोपचाराचं ॲडव्हान्स्ड प्रशिक्षण घेऊन, माझा एका गोष्टीवर ठाम विश्वास बसलाय. ती गोष्ट म्हणजे, सौम्य, अर्थपूर्ण संवादात जादू असते.
जेव्हा व्यक्ती स्वत:च्या आंतरिक जगात, स्वत:च्या मनात उत्सुकतेने, कुतूहलाने डोकावते तेव्हा तिच्यात एक सकारात्मक बदल घडू लागतो. हे परिवर्तन घडवून आणण्यासाठी आवश्यक असते ती एक शांत, सेफ जागा. अशी जागा जिथे आपल्याला सुरक्षित वाटतं, जिथे आपलं म्हणणं आपल्याला बिनदिक्कतपणे मांडता येतं, जिथे आपल्याला हमी असते की कोणीतरी आपल्याला समजून घेतंय, आपलं संपूर्ण म्हणणं ऐकून घेतंय. सौम्य, अर्थपूर्ण संवादातून अशी जागा तुमच्यासाठी निर्माण करण्यासाठी, आणि तुम्हालाही अशी जागा निर्माण कशी करायची, हे शिकवण्याच्या हेतूने मी मनसेन्स काउन्सिलिंगची स्थापना केली.
माझ्या थेरपी सत्रात मी वेगवेगळी तंत्र आणि साधने वापरते. उदा. मन जागरुक ठेवण्याचे तंत्र (माईंडफुलनेस), शरीर-आधारित किंवा मज्जासंस्था नियमनावर आधारित तंत्र, व्यक्ती-केंद्रित दृष्टीकोनावर आधारित साधने, इ. आपल्या मनातला गुंता हळूवारपणे सोडवण्यात या तंत्रांची खूप मदत होते.


पण काळजी करू नका. थेरपी सत्रात तुम्हाला कळणार नाहीत असे मोठमोठे शब्द मी वापरत नाही. गोष्टी अतिशय साध्या, सोप्या करून मांडणं ही माझी खासियत आहे. त्यामुळे कुठल्याही प्रकारचं दडपण न बाळगता माझ्याशी संपर्क साधा.
स्वत:शी नव्याने ओळख करण्यासाठी जेव्हा तुम्ही तयार व्हाल, तेव्हा मीही तुम्हाला ती ओळख करून देण्यात मदत करण्यासाठी सज्ज असेन.
थेरपीबद्दल प्रश्न आहेत?
चला उत्तर शोधूया.
थेरपीच्या पहिल्या सत्रात काय होतं?
तुम्ही इथे कशामुळे आलात, तुमच्या काय अपेक्षा आहेत, याबद्दल आपण बोलतो. मनात साचलेल्या सगळ्याच गोष्टी त्याच क्षणी बोलाव्या लागतील, असा कुठलाही दबाव तुमच्यावर येत नाही.
माझ्या भूतकाळाविषयी मला बोलावंच लागणार का?
तुम्हाला हवं असेल तरंच, तुमची मनाची तयारी असेल, तेव्हाच. तोपर्यंत आपण तुमच्या वर्तमानावर लक्ष केंद्रित करू शकतो.
थेरपी किती काळासाठी घ्यावी लागेल?
ते तुमच्यावर, तुमच्या समस्यांवर अवलंबून आहे. एखाद्याला काहीच सत्रांत हलकं वाटतं, तर दुस-यला त्यापेक्षा अधिक काळ लागू शकतो.
ऑनलाइन थेरपी खरोखर प्रभावी आहे का?
हो! प्रत्यक्ष थेरपीइतकीच ऑनलाइन थेरपी प्रभावी आहे. पण जर तुम्हाला स्क्रीनची, किंवा व्हर्च्युअल संपर्काची सवय नसेल, तर ऑफलाइन सत्र तुम्हाला अधिक फायद्याचं ठरू शकतं.
थेरपी सत्रात काय बोलायचं हे मला माहित नसेल तर?
हरकत नाही. मी मार्गदर्शन करेन, आणि सत्रात काय करायचं, कसं करायचं ते आपण एकत्र ठरवू.
जर थेरपी माझ्यासाठी उपयुक्त ठरत नसेल तर?
त्याबद्दल आपण बोलायचं. थेरपी ही एक एकत्र मिळून काम करण्याची गोष्ट आहे. तुमचा अभिप्राय, तुमच्यासाठी काय उपयुक्त ठरतंय, काय नाही, याबद्दल आपल्यात संवाद होणं आवश्यक आहे. कारण त्याप्रमाणे आपण थेरपी अधिक प्रभावी करण्यासाठी तिची दिशा बदलू शकतो.
थेरपी मोठ्या काळासाठी घ्यावी लागणार असेल तर डिस्काऊंट मिळेल का?
आर्थिक अडचण असलेल्यांसाठी मी सवलतीचे दर देते. तुम्हाला कमी दराच्या सत्राची गरज असेल तर तुम्ही ईमेलवर याबद्दल माझ्याशी बोलू शकता.
थेरपीसाठी तयार आहात?
त्याच एका चक्रात तुम्ही वर्षानुवर्ष अडकला असाल,
तर आता त्यातून बाहेर पडण्याची, मोकळा श्वास घेण्याची वेळ आली आहे.
आजच संपर्क साधा.