चिंताग्रस्तता, ताण-तणाव, प्रेम & बरंच काही

रिकाम्या टाकी वर गाडी चालतेय
  • "अजून किती दिवस असं चालणार" हा विचार सतत डोक्यात असणं

  • कितीही काहीही केलं तरी कमीच वाटणं

  • साधी, नेहमीची लहान-सहान कामं करतानाही थकल्यासारखं वाटणं

  • इच्छा नसतानाही इतरांवर चिडचिड करणं

  • डोक्याला, शरीराला, मनाला अजिबात आराम नाही, सतत कसली ना कसली जबाबदारी डोक्यावर आहेच असं वाटणं

  • मेंदू थकलाय, पण त्याला आराम कसा द्यायचा हे न कळणं

प्रेमाचं ओझं वाटतंय
  • जवळीक हवी असून सुद्धा इतरांना चार हात लांब ठेवणं

  • जोडीदाराशी त्याच त्याच विषयावर पुन्हा पुन्हा भांडण होणं

  • भांडण होत असेल तर एकदम गप्प होणं किंवा नको ते बोलून जाणं

  • कायम स्वत:ला बाजूला ठेऊन इतरांच्या गरजा पुरवणं, आणि माझी काही किंमतच नाही असं वाटणं

  • शारीरिक जवळीक साधता न येणं, किंवा अशा क्षणांमध्ये गांगरून जाणं

  • आपण कायम चुकीच्या माणसाच्या प्रेमात पडतो असं वाटणं

काहीतरी बिनसलंय, पण काय, ते माहित नाही
  • नेमकं असं काही कारण नसूनही सारखं उदास वाटणं

  • बाहेरून शांत, पण आतून ज्वालामुखीसारखं वाटणं

  • काही दिवस बरे जाणं, पण इतर वेळी आपण फक्त दिवस ढकलतोय असं वाटणं

  • छोट्या छोट्या गोष्टी सुद्धा मनात खोल रुतणं

  • काहीतरी हरवलंय, पण नेमकं काय, ते न कळणं

  • जुन्या आठवणी काही केल्या मनातून न जाणं

विचारांचं चक्र थांबतच नाही
  • इतरांच्या टेक्स्ट मेसेजेसपासून चेह-याच्या हावभावांपर्यंत सगळ्या गोष्टींचं सतत विश्लेषण करणं

  • सगळ्या वाईट शक्यतांचा आधीपासून विचार करून ठेवणं

  • निर्णय चुकेल अशा भितीमुळे कुठलाही निर्णय घेणं जड जाणं

  • माझं जरा अति होतंय का, असं सारखं वाटणं

  • इतरांशी थेट संवाद होण्यापेक्षा स्वत:च्या डोक्यात तो संवाद करणं, त्याची स्क्रिप्ट तयार करून ते नाट्य सतत मनातल्या मनात साकारणं

  • मेंदू बंद करता यायला हवा होता, असं वाटणं

स्वत:चा विसर पडलाय
  • सतत स्वत:ची तुलना इतरांशी करणं

  • आपण कमी पडतोय, असं कायम वाटणं

  • कुणी कौतुक केलं तर ते खोटं वाटणं, किंवा ओशाळल्यासारखं वाटणं

  • स्वत:ला कमी लेखणं

  • जरा स्वत:वर विश्वास असता तर माझं आयुष्य आज वेगळं असतं, असं वाटणं

  • मी कोण आहे, मला नेमकं काय आवडतं, मला आयुष्यात काय हवंय, अशा प्रश्नांची उत्तरं न मिळणं

हवं तर आहे, पण...
  • जोडीदाराच्या जवळ यावंसं वाटतं, पण नेमक्या क्षणी काहीतरी आतून अडवतं

  • तो/ती माझ्याविषयी काय विचार करत असेल, या विचारांत अडकणं

  • काहीतरी चुकतंय, पण हे असं वाटणं नॉर्मल आहे का, ही चिंता सतावणं

  • शारीरिक जवळीकीच्या क्षणांमध्ये अचानक एकदम बंद पडल्यासारखं होणं

  • या सगळ्याबद्दल जोडीदाराशी कसं बोलायचं, हे न कळणं

  • आपल्यातच काहीतरी प्रॉब्लम आहे, असं वाटणं

यांत मी तुम्हाला मदत करू शकते

green leafed plant on clear glass vase filled with water

What Therapy Looks Like at Munnsense Counselling

थेरपी सत्रामध्ये मी सगळ्यात जास्त महत्त्व देते कुतूहलाला. त्यामुळे सत्रात आपण दोघं एकत्र मिळून तुमच्या आयुष्याकडे, तुमच्या समस्यांकडे, तुमच्या वागण्याच्या पद्धतींकडे फ्रेश नजरेने, जाणून घेण्याच्या हेतूने बघतो. तुमच्या डोक्यातले विचार, तुमच्या दबलेल्या भावना, तुमच्या शरीराची भाषा तुम्हाला काय सांगण्याचा प्रयत्न करतेय, हे आपण समजून घ्यायला शिकतो. कसलीही घाई न करता. तुमच्या गतीनुसार, तुमच्या सोयीप्रमाणे.

माझ्यासोबत थेरपी सुरू करणं अगदी सोपं आहे:

1) फॉर्म भरा किंवा ईमेल वर हेलो बोला

2) माझ्याशी ईमेलवर थोडक्यात संवाद साधून आपलं ट्यूनिंग जमतंय का पहा

3) मी पाठवलेलं संमतीपत्र आणि बुकिंग लिंक तपासा

4) संमतीपत्र सबमिट करा, थेरपी सत्राची वेळ निवडा, पेमेंट करा, झालं!

थेरपी सत्रामध्ये तुम्ही स्वत:शी प्रामाणिक होऊन, निश्चिंतपणे तुमच्या भावना, तुमचे विचार व्यक्त करू शकता. प्रत्येक वेळी मन मारून जगणारं तुमचं स्ट्रॉंग, संयमी व्हर्जन न धारण करता तुमच्या आतील लहान मुलाला कसं उत्तेजन द्यायचं, हे शिकण्यासाठी थेरपी ही उत्तम जागा आहे.

प्रत्येक सत्र, प्रत्येक संभाषण म्हणजे तुम्ही मानसिक स्वास्थ्याच्या दिशेने उचललेलं एक पाऊल.

Munnsense Counselling मध्ये फक्त अपॉइंटमेंट घेऊनच थेरपी दिली जाते. जर तुम्ही संकटात असाल, किंवा तुम्हाला तात्काळ मदतीची गरज असेल तर कृपया २४/७ मानसिक आरोग्य हेल्पलाइनशी संपर्क साधा. वेळेवर मदत मिळवा.